CCTP बद्दल

CCTP मध्ये आपले स्वागत आहे

Certificate of Computer Typing Proficiency (CCTP) हा MKCL तर्फे MS-CIT विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेला एक पूरक अभ्यासक्रम असून, इंग्रजी, मराठी व हिंदी भाषांमध्ये ३० किंवा ४० शब्द प्रति मिनिट या गतीने संगणक टायपिंग प्राविण्य विकसित करण्यासाठी तयार करण्यात आलेला आहे. या अभ्यासक्रमात ERA प्रणालीमार्फत उपलब्ध करुन देण्यात आलेल्या ५० संरचित सत्रांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये टायपिंग गती, अचूकता, बोटांची योग्य ठेवण व एर्गोनॉमिक्स यांचे कौशल्य विकसित केले जाते. तसेच शासनमान्य Remington कीबोर्ड लेआउट चा टायपिंग सराव या सत्रांमधून केला जातो. अभ्यासक्रमातील सर्व सत्रे यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर आणि MSBTE तर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या अंतिम ऑनलाईन टायपिंग परीक्षेत पात्र ठरल्यानंतर विद्यार्थ्यांना MSBTE आणि MKCL या दोन्ही संस्थांचे संयुक्त CCTP शासकीय प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल.

मुख्य वैशिष्ट्ये
शासकीय मान्यताप्राप्त संयुक्त प्रमाणपत्र
विद्यार्थ्यांच्या टायपिंग प्राविण्यास अधिकृत मान्यता देणारे MSBTE व MKCL या दोन प्रतिष्ठित संस्थांचे संयुक्त प्रमाणपत्र.

बहुभाषिक टायपिंग प्राविण्य
इंग्रजी, मराठी व हिंदी भाषांमध्ये ३० किंवा ४० शब्द प्रति मिनिट या गतींपैकी एक पर्याय निवडण्याची सुविधा — विविध क्षेत्रांतील व्यवहार्य गरजांनुसार उपयुक्त.

वैज्ञानिक सरावाधिष्ठित शिक्षणपद्धती
ERA मधील ५० ई-लर्निंग सत्रांमध्ये टप्प्याटप्प्याने टायपिंग सराव, गती-वृद्धीचे मार्गदर्शन, चूक-निर्मूलन सराव, मॉक टेस्ट्स तसेच शासनमान्य Remington लेआउटचा अभ्यास.

रोजगारक्षमतेत व उत्पादकतेत वाढ
व्यावसायिक व शैक्षणिक जीवनात संगणकीय कामे वेगाने, अचूकपणे आणि आत्मविश्वासाने करण्याची क्षमता विकसित होऊन विद्यार्थ्यांच्या करिअरमध्ये अधिक संधी उपलब्ध होतात.