Certificate of Computer Typing Proficiency (CCTP) टेस्ट ही MS-CIT अभ्यासक्रम यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. यामध्ये मागील वर्षे व मागील बॅचमधील MS-CIT उत्तीर्ण विद्यार्थी देखील समाविष्ट आहेत.
CCTP मध्ये प्रवेश केवळ विद्यमान MS-CIT Learner Code चा वापर करून पुनर्नोंदणी (Re-registration) द्वारेच करता येईल. CCTP साठी स्वतंत्र (Standalone) प्रवेशास परवानगी नाही.
MS-CIT मध्ये प्रवेश घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना उपलब्ध असलेल्या सहा CCTP टेस्ट पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय निवडण्याची मुभा आहे; ही निवड विद्यार्थ्यांसाठी ऐच्छिक असून अनिवार्य नाही.
प्रवेशावेळी विद्यार्थी खालील सहा CCTP टेस्ट पर्यायांपैकी कोणताही एक पर्याय निवडू शकतात:
- Certificate of Computer Typing Proficiency (CCTP) – 30 WPM (English)
- Certificate of Computer Typing Proficiency (CCTP) – 40 WPM (English)
- Certificate of Computer Typing Proficiency (CCTP) – 30 WPM (Marathi)
- Certificate of Computer Typing Proficiency (CCTP) – 40 WPM (Marathi)
- Certificate of Computer Typing Proficiency (CCTP) – 30 WPM (Hindi)
- Certificate of Computer Typing Proficiency (CCTP) – 40 WPM (Hindi)
CCTP टेस्ट साठी नोंदणी करणे अनिवार्य नाही. ही test पूरक (Add-on) व ऐच्छिक (Optional) असून MS-CIT प्रवेश घेताना पूर्णतः विद्यार्थ्याच्या इच्छेवर आधारित आहे.
