CCTP अभ्यासक्रमाची Final Online Examination ही MS-CIT अंतिम ऑनलाईन परीक्षेनंतर तत्काळ घेण्यात येईल. या परीक्षेचा कालावधी १० मिनिटांचा असेल.
परीक्षा पात्रता:
- विद्यार्थ्यांनी MS-CIT अभ्यासक्रम तसेच CCTP अभ्यासक्रम ERA प्रणालीमध्ये पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
- विद्यार्थ्यांनी निवडलेल्या भाषेनुसार (इंग्रजी / मराठी / हिंदी) ३० किंवा ४० शब्द प्रति मिनिट टायपिंग गती अंतर्गत सरावाद्वारे साध्य केलेली असणे आवश्यक आहे.
परीक्षेचे स्वरूप
- कालावधी: १० मिनिटे
- पद्धत: शासनमान्य Remington Keyboard Layout वापरून Online Examination
फेरपरीक्षा
- विद्यार्थ्यांना MS-CIT आणि CCTP या दोन्ही परीक्षांसाठी १ + २ असे एकूण ३ प्रयत्न उपलब्ध असतील.
- कोणताही विद्यार्थी अनुपस्थित / अनुत्तीर्ण असल्यास, त्याला MSBTE तर्फे वेळोवेळी जाहीर करण्यात येणारे स्वतंत्र फेरपरीक्षा शुल्क भरावे लागेल.
